राजापूर : श्री. गणेश आडीवरेकर मित्र मंडळ व केळवली पाचल विभाग शिवसेना राजापूरच्या वतीने राजापुरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता राजापूर रोड रेल्वेस्टेशन नजीक जांभवली माळ येथे राज्यस्तरीय भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला रोख रूपये ५१ हजार व मानाची ढाल देवून सन्मानित केले जाणार आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ सकाळी ९ वाजता आमदार किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तर पारितोषिक वितरण सायं. ५ वाजता होणार आहे. याप्रसंगी राज्याचे बंदर व मत्स्य विकास मंत्री ना. नितेश राणे, राज्याचे उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत, मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, शिवसेना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राहुल पंडीत, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, शिवसेना राजापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, शिवसेना राजापूर तालुका अध्यक्ष दिपक नागले, आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून प्रविण कानडे शिवसेना संपर्कप्रमुख केळवली, मुंबई, प्रल्हाद नारकर उपविभागप्रमुख ओझर असणार आहेत.
या कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील राज्यस्तरीय पारितोषिके पुढील प्रमाणे राहणार आहेत. त्यामध्ये प्रथम पारितोषिक रोख रूपये ५१,०००/- व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक रोख २५,०००/- व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक १५,०००/- व मानाची ढाल अशी पारितोषिक ठेवण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक रोख ३१,०००/- व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक १५,०००/- व मानाची ढाल, तृतीय पारितोषिक १०,०००/- व मानाची ढाल तसेच तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक रोख रूपये १०,०००/- व मानाची ढाल, द्वितीय पारितोषिक रोख ५,०००/- व मानाची ढाल तृतीय पारितोषिक रोख रूपये ३,०००/- व मानाची ढाल देवून सन्मानित केले जाणार आहे.
या स्पर्धेची जंगी तयारी आयोजकांच्या वतीने करण्यात आले असून यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातुन बैलगाडी स्पर्धक दाखल होणार आहेत. या स्पर्धेला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक शिवसेना केळवली विभाग प्रमुख नाना कोरगावकर, प्रल्हाद नारकर, प्रविण कानडे, पाचल विभाग प्रमुख शैलेश साळवी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:42 PM 03/Jan/2025














