रत्नागिरी : कोतवडे येथील सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्याविरोधात गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे सनगरेववाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार २ जानेवारी रोजी सायंकाळी ४.६० वा. सुमारास करण्यात आली. दीपक कमलाकर वारेकर (३४, रा. सनगरेवाडी कोतवडे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी तो आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी आपल्या समोर दारूची बाटली ठेवून बसलेला मिळून आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 04/Jan/2025