भविष्यासाठी संसाधनांचे मापन अत्यावश्यक : डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या केळ्ये येथील विशेष निवासी शिबिर निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात प्राध्यापक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी ग्रामीण संसाधनांचे महत्व सांगितले.

संसाधने म्हणजे काय, कोणती गोष्ट संसाधन होते, अशी संसाधने कशी जपली पाहिजेत याचे संवादात्मक ज्ञान त्यांनी स्वयंसेवकांना दिले. ग्रामीण संसाधनांची उपयुक्तता प्राचीन काळातील लोकांना ज्ञात होती; परंतु सध्याच्या पिढीला त्याची उपयुक्तता समजणे तसेच पाण्यासारख्या संसाधनांचे विविध पातळ्यांवर मापन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पी. एम. उषा अंतर्गत ‘संसाधन मापन’ अभ्यासक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन पार्थ बापट व डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी विविध कृती सत्रातून केले. संसाधन मापनसंदर्भात उपस्थित स्वयंसेवक अध्ययनार्थींना त्यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 04-01-2025