माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल,इंग्लिश मिडीयम स्कूल,अँड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे चे वार्षिक स्नेहसम्मेलन मोठ्या उत्साहात झाले.
यानिमित्त विद्यार्थ्यांनी गायन,नृत्य,नाटिका,वादन, आदी अनेक प्रकार सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित.विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. होता.विविधगुणर्शनाच्या कार्यक्रमाचे निवेदन गौरव पोंक्षे,महादेव परब,भाग्यश्री सहस्त्रबुद्धे,सीमा गुरव यांनी केले.
कार्यक्रमावेळी संस्था उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव दीपक पोंक्षे,खजिनदार हनिफ म्हाते,संचालक दीपक शिगवण,आदींसह मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले आदी उपस्थित होते.यावर्षी स्नेहसम्मेलन प्रमुख म्हणून संतोष कुलकर्णी तर सांस्कृतिक प्रमुख म्हणून सौ विशाखा धावडे यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाअंती आभार गौरव पोंक्षे यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 04-01-2025














