रत्नागिरी : विधानसभा निवडणूक निकालानंतर पराभूत झालेले उबाठाचे राजन साळवी सध्या कमालीचे अस्वस्थ असल्याचे दिसत आहे. लवकरच त्यांचा भाजप प्रवेश होणार अशा बातम्या देखील प्रसारमाध्यमातून येत आहेत. कालच या बातम्यांचे राजन साळवी यांनी खंडन केले असले तरी कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना माजी खासदार विनायक राउत यांचे मोठे वक्तव्य आता समोर आलंय.
माजी खासदार विनायक राउत हे आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणूक वेळी लांजा किंवा राजापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा लावल्या होत्या मात्र त्या राजन साळवी यांनी नाकारल्याचा खुलासा विनायक राउत यांनी केला आहे. तसेच ते म्हणाले कि राजन साळवी यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले आहे. राजन साळवी यांच्यासाठी मातोश्रीचे दर्वाचे उघडे आहेत. ते कधीही उद्धव ठाकरे यांना फोन करू शकतात. पैसा आणि सत्तेच्या जोरावर सध्याचे राजकारणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावत आहेत. ज्यांनी स्वतःला विकायला ठेवले आहे त्यांचं सोडा पण निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुन्हा गरुड झेप घेईल, असा विश्वास विनायक राउत यांनी व्यक्त केलाय. राजन साळवी पक्षाशी कायम प्रामाणिक राहतील, असा विश्वास देखील राउत यांनी व्यक्त केलाय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:10 04-01-2025














