सुबोध भावे दिग्दर्शित आणि मुख्य भूमिका असलेल्या “संगीत मानापमान” चित्रपटात सहाय्यक व्यक्तीरेखेच्या रूपात दिसणार रत्नागिरीतील तरुण अभिनेता ऋषिराज धुंदूर !

◼️ सदर चित्रपट येत्या १० जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार

मुंबई : लोकप्रिय अभिनेते-दिग्दर्शक सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेला ११४ वर्षांपूर्वीचा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ रुपेरी पडद्यावर “संगीत मानापमान” या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार, हा चित्रपट येत्या १० जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शीत होत आहे.

या चित्रपटात रत्नागिरी मधील अभिनेता कु. ऋषिराज किशोर धुंदूर याने सहाय्यक व्यक्तीरेखा साकारली आहे. दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी हा चित्रपट संगीतबद्ध केला आहे. तसेच दीपाली विचारे आणि सुभाष नकाशे यांनी नृत्य दिगदर्शन केले आहे. अनेक दिग्गज कलाकारांबरोबर साधारण २०-२५ दिवस काम करता आलं. सुबोध भावे सरांच मोलाचं मार्गदर्शन मिळालं. अभिनय क्षेत्रातील सततच्या धडपडीनंतर कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर आणि सुशील महादेव यांच्या माध्यमातून इतकी मोठी संधी मिळाल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

लहानपणापासूनच अभिनय-गायन-नृत्य याची आवड होती, आवडीचे रुपांतर छंदात झाले. तिथून पुढे मा. वि. मंदिर जयगडच्या स्नेहसंमेलनापासून सुरु झालेला हा अभिनयाचा प्रवास रमेश किर कला अकादमीच्या प्रदीप शिवगण आणि डॉ. शशांक पाटील यांच्या मार्गदर्शनातून एकांकिका, उत्सवाची-व्यावसायिक-स्पर्धेची नाटक, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज- कोकणातल्या झाकन्या आणि दिव्यांग १/२ त्यानंतर जिओ स्टुडिओ आणि श्री गणेश मार्केटिंग यांनी निर्मित केलेल्या एवढ्या मोठ्या चित्रपटापर्यंत येऊन पोहोचलाय. हे स्वप्नवत वाटत, ग्रामीण भागातील मुलांना कला क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात यायचे असेल तर शालेय शिक्षणा बरोबरच अभिनय-संगीत-नृत्य या क्षेत्राची तोंड ओळख करून द्यायला हवी, जेणेकरून या क्षेत्राबद्दल भीती न वाटता भविष्यात अनेक कलाकार/तंत्रज्ञ तयार होतील असे मत व्यक्त केले. अजून खुप काम करायचंय, ही सुरुवात झालीय. असं ऋषिराज धुंदूर यांनी सांगितलं.

१० जानेवारी पासून रत्नागिरी सह संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होतोय, सर्वांनी हा चित्रपट नक्की पहावा, असे आवाहन अभिनेता ऋषिराज धुंदूर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:34 04-01-2025