नागपूर : नागपूरच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, हा मृत्यू H5N1 (बर्ड फ्ल्यु) ने झाल्याचा खळबळजनक अहवाल भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झालाय. H5N1 हा पक्षांमध्ये आढळणार विषाणू आहे. मात्र वाघ व बिबट्यांना यांची लागण झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडली आहे. H5N1 मुळे वाघांचा मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
राज्यभरातील सर्व प्राणी संग्रहालय, अभयारण्ये आणि उपचार केंद्रांना रेड अलर्ट
सध्या गोरेवाड रेस्क्यु सेंटर ला 12 वाघ व 24 बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांना H5N1 लागण झाली नाही. मात्र संपूर्ण रेस्क्यू सेंटरचे रोज निर्जंतुकीकरण केले जात असून प्राण्यांमध्ये सोशल डीस्टंटसिंग पळाली जात असल्याची माहिती गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय अधिकारी सातनीक भागवत यांनी दिली आहे. दुसरीकडे हा प्रकार लक्षात घेता राज्यातील सर्व प्राणी संग्रहालय, अभयारण्ये आणि उपचार केंद्रांना रेड अलर्ट देण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 06-01-2025













