झरेवाडी येथे पुलासाठी खोदलेल्या चरात पडून दुचाकीस्वार जखमी; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून ब्रीजसाठी खोदलेल्या चरात पडून दुचाकी चालक जखमी झाला. अपघाताची ही घटना २३ डिसेंबर रोजी झरेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवार ३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आझादहुसेन अझरहुसेन अन्सारी (१९, मुळ रा. सारंग, बिहार सध्या रा. एमआयडीसी, रत्नागिरी) असे अपघातातील जखमी आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी तो दुचाकी (एमएच-०८-यू- ६७७७) भरधाव वेगाने घेउन मुंबई-गोवा महामार्गावरुन येत होता.

तो झरेवाडी येथे आला असता पुलासाठी खोदलेल्या चराच्या बाजूने वेगाने जात असताना गाडीसह ४० ते ४५ फूट खोल पडून हा अपघात झाला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 06/Jan/2025