रत्नागिरी जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्याची कमतरता

रत्नागिरी : प्रधानमंत्री पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना पुरवला जाणारा धान्य मालाची मागणी जुलै महिन्यात करण्यात आली होती. मात्र सप्टेंबर महिना संपला तरीही जिल्ह्यातील अनेक शाळांना धान्य मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन योजनेत अडथळे निर्माण झाले आहेत.

तालुकास्तरावरील पर्यवेक्षण व्यवस्था आणि जिल्हा प्रशासन यांचे विद्यार्थ्यांच्या मुलभुत गरजांकडे लक्ष नाही. जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या मुलांना मध्यान्ह भोजन योजनेचे लाभ मिळालेला नाही. पुरवठादाराकडून पुरवठा होत नाही आणि प्रशासन लक्ष देत नाहीत. यामध्ये सर्व शाळांचे मुख्याध्यापक भरडले जात आहेत. ही योजना त्या मुख्याध्यापकांच्या गळ्याशी आलेली आहे. अधिकाऱ्यांकडून माधान्ह भोजन योजना बंद पडता कामा नये, मुले पोषण आहारापासून वंचित राहणार नाहीत याची खबरदारी तुमची आहे असे मुख्याध्यापकांना सांगून मोकळे होतात. त्यामुळे सगळे खापर मुख्याध्यापक आणि त्या शाळेतील शिक्षकांवर फूटत आहे. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापकांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून धान्य लवकरच पुरवले जाईल असे सांगण्यात आले होते. तसेच नविन मेनूप्रमाणे मागणी करा अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे सर्वांनी वेळेत मागणी केली. मात्र धान्यादीमाल अद्याप शाळांना प्राप्त झालेला नाही. शिल्लक धान्य संपले असून मुख्याध्यापक व शिक्षकांपुढे आता काय करायचे हा प्रश्न पडलेला आहे. प्रशासन काहीही करत नाही आणि मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. अंडी, केळी यांचे अनुदानही महिना झाला तरीही प्राप्त होत नाही. जिल्हापरिषदेत पदाधिकारी नाहीत, त्यामुळे प्रशासनाला कोणीच जाब विचारत नाहीत.

शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या ठेकेदाराबरोबर चर्चा झालेली आहे. त्याने पुरवठा सुरू असल्याचे नुकतेच सांगितले आहे. पुरवठ्याबाबतच पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. – जयदेव कासार, शिक्षणाधिकारी

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा पोषण आहार आलेला नाही. तसेच रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी जुलैचा आहारही आलेला नाही. त्यामुळे आहार कसा द्यायचा असा प्रश्न आहे. उधार-उसनवारीवर एखादा महिना आहार देण्याचा प्रयत्न केला जातो. -दीपक शिंदे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:06 30-09-2024