खेड : कुवारसाई, श्रीकृष्ण मंदिर येथील शेडचे भूमिपूजन

खेड : शहरातील कुवारसाई, श्रीकृष्ण मंदिर येथील शेडचे भूमिपूजन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या मंदिराच्या ठिकाणी शेडची गरज असल्याची मागणी येथील नागरिकांनी केली असता, त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून कदम यांनी निधी उपलब्ध करून दिला.

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, शशिकांत चव्हाण, महिला आघाडी शहर संघटक माधवी राजेश बुटाला, राजेश बुटाला, सतीश चिकणे युवासेना शहरप्रमुख सिद्धेश खेडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 30/Sep/2024