लांजा : गावातील सर्व गावकर मानकरी आणि मंडळी माझ्यासाठी एकत्र आले हाच माझा विजय असल्याचे प्रतिपादन रत्न सिंधु योजनेचे सदस्य किरण सामंत यांनी कोलथे येथे केले. लांजा तालुक्यातील कोलथे गावात गावभेट बैठकीचा कार्यक्रम किरण सामंत यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी गावातील गावकर, मानकरी, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी किरण सामंत यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. गावातील विकासाचा आरसा किरण सामंत यांच्यात दिसतो आणि सर्व गट तट बाजूला सोडून आम्ही गावाच्या विकासाठी एकत्र आलोय तो फक्त किरण सामंत यांच्या वर विश्वास ठेवून आम्ही एकत्र आलोय. आम्हाला खात्री आहे आज पर्यंत ज्यांना ज्यांना मतदान केले त्यांनी गावाच्या विकासासाठी दिवे लावले. मात्र आम्ही किरण सामंत यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि गावाला खात्री आहे किरण सामंत हे गावाच्या विकासाला चालना देतील त्यासाठी आम्ही किरण सामंत यांना जाहीर एकमुखी पाठिंबा देत असल्याचे कोलथे वासियानी सांगितले.
यावेळी बोलताना किरण सामंत म्हणाले की, तुम्ही माझ्यासाठी एकत्र आले हाच माझा विजय…! तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलाय त्याला तडा जावू देणार नाही, हे तुमच्या गावाच्या मंदिरात शब्द देतो. मी फक्त कामे देवून थांबलो नाही तर तुमची दिलेल्या ६ कामांपैकी ३ कामे मंजूर करून तुमच्या गावात आलोय. त्यामुळे मी बोलणार लोकप्रतनिधीं नसून काम करणार लोकप्रतनिधी आहे.
यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख राजू कुरूप, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, वसंत घडशी, एस. एन. कांबळे, राजू धावणे, खोत अनिकेत तांबे, मानकरी सचिन लिंगायत, गावकर दीपक कुंभार, सरपंच पर्शुराम घडशी, जयदीप लिंगायत यांच्या सहित शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 30/Sep/2024














