Railways Recruitment : भारतीय रेल्वेकडूनरेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड श्रेणीतील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच ७ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे.
इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
रिक्त जागांची माहिती
पदव्युत्तर शिक्षक (पीजीची शिक्षक): १८७ पदे
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी शिक्षक): ३३८ पदे
वैज्ञानिक पर्यवेक्षक (अर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण): ०३ पदे
मुख्य विधी सहाय्यक: ५४ पदे
सरकारी वकील: २० पदे
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (पीटीआय) – इंग्रजी माध्यम: १८ पदे
वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण: ०२ पदे
कनिष्ठ अनुवादक हिंदी: १३० पदे
वरिष्ठ प्रचार निरीक्षक: ०३ पदे
कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक: ५९ पदे
ग्रंथपाल: १० पदे
संगीत शिक्षक (महिला): ०३ पदे
प्राथमिक रेल्वे शिक्षक: १८८ पदे
सहाय्यक शिक्षक (महिला कनिष्ठ शाळा): ०२ पदे
प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा: ०७ जागा
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्रज्ञ): १२ पदे
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार १२ वी ते पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. शिक्षक पदांसाठी उमेदवाराने B.Ed/D.El.Ed/TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पदानुसार उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ ते ४८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळेल.
अर्जाचे शुल्क
उमेदवारांनी अर्जासोबत श्रेणीनिहाय शुल्क जमा करणे आवश्यक आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्ज शुल्काशिवाय अर्ज अपूर्ण मानले जातील आणि ते नाकारले जातील.
याकडे लक्ष असू द्या…
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ७ जानेवारीपासून सुरू होणार असून ६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे. भरतीची तारीख निघून गेल्यानंतर उमेदवाराला अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 07-01-2025
