पावस : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी मराठी शाळेतील ४० विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कीट शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश म्हादये यांच्या प्रयत्नाने शैक्षणिक उठावांतर्गत देण्यात आले.
खरडेवाडी कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मंडळातर्फे विश्वनाथ नवाले, प्रकाश खरडे, गोकुळ खरडे यांनी वीस स्पोर्ट्स कीट वीस विद्यार्थ्यांना दिले. गणेश तरुण मंडळ वरची म्हादयेवाडी यांच्या वतीने दिगंबर सुरेश म्हादये यांनी दहा विद्यार्थ्यांना दहा स्पोर्ट्स कीट दिली. वैभव राजाराम खरडे यांनी दहा विद्यार्थ्यांना दहा स्पोर्ट्स कीट दिली. या वेळी मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष काटकर, शिक्षिका सौ. शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश म्हादये, खरडेवाडी कला क्रीडा मंडळाचे प्रकाश खरडे, गोकुळ खरडे, सूर्यकांत मांडवकर, विनायक खरडे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 07-01-2025














