संगमेश्वर : वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यात सकाळी दाट धुके आणि दुपारी कडक ऊन, असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे संगमेश्वरवासीय सुखावले आहेत. मात्र, कडक उनामुळे शेतकरीही चिंतेत आहेत; परंतु या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागलेला आहे.

गेल्या आठ दिवसांत वातावरण बदलले असून थंडीचा कडाका वाढलेला आहे. ग्रामीण भागात हे वातावरण अनुभवायला अधिक मिळत आहे. सकाळी दाट धुक्याचा पडत असून थंडीही सुखावणारी आहे. संगमेश्वर तालुका डोंगराळ भागात वसलेला असल्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवते. सकाळी ९ वाजेपर्यंत गारवा जाणवत असतो; परंतु दुपारनंतर उन्हाचा कडाका वाढू लागतो. परतीच्या पावसानंतर नोव्हेंबर महिन्यात थंडी सुरू झाली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात सकाळी धुके आणि कडक ऊन असे वातावरण आहे. कडक उन्हामुळे काजू, तसेच आंबाचा मोहोर काळवंडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 07/Jan/2025