खेड : शहरातील निवाचा तळ खतीब यांच्या घराजवळ नाला दुरुस्ती करण्याच्या कामाचे भूमिपूजन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कामासाठी ३९ लाख ६३ हजार ५७३ रुपये मंजूर झाले आहेत. यावेळी आ. कदम म्हणाले, असे अनेक विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी सदैव कटिबद्ध राहीन. शिवसैनिक व नागरिकांच्या भक्कम साथीमुळेच खेड शहराला खऱ्या विकास मार्गावर आपण घेऊन जात आहोत. ही साथ अशीच मिळत रहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख कुंदन नागेश सातपुते, अल्पसंख्यांक शहर प्रमुख सरफराज पांगारकर, उप शहरप्रमुख जावेद कौचली, मजीद खान, शामशुद्दीन जुईकर, सफा व जमा मस्जिदचे सचिव व माजी नगरसेवक फारुक मणियार, अफजल पांगारकर, वासिम रायणे युसूफ गझली, गफूर मुल्लाजी, अफान मुसा, वाजीद मणियार, खाली फोपलोणकर, खळफान मणियार, महिला आघाडी शहर संघटक माधवी बुटाला, युवा सेना शहरप्रमुख सिद्धेश खेडेकर, रसिका खेडेकर, संजना कुडाळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते. वाहिद कडवेकर व इस्माईल पांगारकर यांनी आमदार योगेश कदम यांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 30/Sep/2024














