या कारणासाठी उद्या दिल्लीत होणार उदय सामंत आणि गजेंद्र शेखावत यांच्यात बैठक

दिल्ली : उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत उद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान उद्या सकाळी ९ वाजता दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासोबत उदय सामंत यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार उदय सामंत गजेंद्र शेखावत यांची भेट घेत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मात्र अद्यापही अधिसूचना निघाली नसल्याने हि प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी हि बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.