वुमेन्स कार्निव्हल मध्ये ५००० ची खरेदी करणारी महिला ठरणार “शॉपिंग क्वीन”

◼️ शॉपिंग क्वीन चा क्राऊन, बेल्ट आणि आकर्षक बक्षीस देऊन केला जाणार सन्मान

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे व्यवसायिक प्रदर्शन म्हणून ओळख निर्माण करणारे “वुमेन्स कार्निव्हल” यावर्षी ९ ते १२ जानेवारी दरम्यान रत्नागिरीत जयेश मंगल पार्क येथे आयोजित करण्यात आलंय.

खऱ्या हिऱ्यांच्या आणि सोन्याच्या दागिन्यांपासून कपडे, ड्रेस मटेरीअल, साड्या, शोभेच्या वस्तू, पेंटीग, फुलझाडे आदी अनेक वस्तूंची भरपूर व्हरायटी या कार्निव्हल मध्ये असते. याचसोबत खाद्यमहोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलंय. मोठ्या संखेने महिला सहकुटुंब या प्रदर्शनाला भेट देतात. यावर्षी दर दिवशी या कार्निव्हल मध्ये ५००० रुपयांची खरेदी करणाऱ्या महिलेला ” शॉपिंग क्वीन” हा मान मिळविण्याची संधी देण्यात येणार आहे. शॉपिंग क्वीन चा क्राऊन, बेल्ट आणि आकर्षक बक्षीस देऊन केला जाणार सन्मान केला जाणार आहे. रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी हे बक्षीस प्रायोजित केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 08-01-2025

📰➖♾️➖♾️➖♾️➖📰