रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे साधला संवाद

जिल्ह्यातील विकास कामांची स्थिती व लोकोपयोगी योजनांच्या स्थितीबाबत घेतली माहिती

रत्नागिरी : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांची स्थिती व लोकोपयोगी योजनांच्या स्थितीबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. अशा सूचना दिल्या गेल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिकाऱ्यांना अचानक भेटी देण्याच्या सूचना दिल्या, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, असे दूरदृष्यप्रणालीद्वारे दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 08/Jan/2025