साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी -नागपूर महामार्गाजवळ असलेल्या व व्यापारीदृष्टया महत्वाचे असलेल्या साखरपा बसस्थानकात स्थानकप्रमुख सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान आपली सेवा बजावतात. मात्र सायंकाळी पाच नंतर बसस्थानकात स्थानकप्रमुख नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या स्थानकातून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ये-जा करत असतात. मात्र सायंकाळी साडे पाच नंतर येणाऱ्या गाड्या व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अन्य एसटी गाड्यांची माहिती मिळण्यास प्रवाशांना मोठी अडचण निर्माण होत असून साखरपा बसस्थानकात सायंकाळी देखील बसस्थानक प्रमुख असण्याची नितांत गरज असून दोन वेळेत स्थानकप्रमुखांची नेमणूक होणे गरजेचे आहे, अथवा स्थानकप्रमुखांची वेळ वाढवावी अशी मागणी येथील प्रवासीवर्गातून होत आहे. साखरपा बसस्थानकातील प्रवाशांची तसेच अन्य प्रवाशांची होणारी ही गैरसोय लक्षात घेत रत्नागिरी एसटी विभागाने यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी येथील प्रवाशांमधून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 08/Jan/2025














