रत्नागिरी : डंपिंग ग्राउंड करणाऱ्यांना काजरघाटी ग्रामस्थ शिकवणार धडा

रत्नागिरी : तालुक्यातील काजारघाटी गाव सध्या वेगळ्याच विषयावरून चर्चेत आहे. इतर गावांतील ग्रामस्थ या गावाच्या परिसराला कचराकुंडी बनवत आहेत. आणखी एकाने हद्दच केली. चांदेराई येथील एका व्यक्तीने १८ किमी अंतरावरून गाडीतून कचरा आणून काजरघाटी गावात टाकत असल्याचे ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून त्याला समज दिली आहे. कचरा टाकणाऱ्यांमध्ये सुशिक्षितांचा समावेश आहे. यामुळे काजरघाटी धारेपासून गावातील रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचा यापुढे चांगलाच समाचार घेतला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सोशल मीडियावर या गावातील ग्रामस्थांनी दुसऱ्या गावातील ग्रामस्थाला कचरा टाकताना पकडल्याचा व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल झाली आहे. तालुक्यातील काजरघाटी निसर्गरम्य गाव म्हणून ओळखले जाते, परंतु काही दिवसांपासून या गावाला इतर गावातील बेशिस्त ग्रामस्थ गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली घरातील कचरा रस्त्यावर आणून टाकला जात आहे. यात प्रामुख्याने सुशिक्षित लोकांचा समावेश आहे कचऱ्यामुळे गावात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा त्रास होऊ शकतो याची जाणीव त्यांना नाही. चांदराईतील एका व्यक्तीला इथल्या ग्रामस्थांनी रंगेहाथ कचरा टाकताना पकडले. त्याला योग्य समज देऊन पुन्हा कचरा गाडीत भरून परत पाठवले. यापुढे गावातील रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला जाईल, असे ग्रामस्थांनी ठणकावले आहे.

ग्रामस्थांनी साफ केला कचरा
ग्रामस्थांनी काजरघाटी येथील कचराकुंडी बनवलेला भाग ग्रामस्थांनी स्वतः हुन साफ केला आहे. त्या ठिकाणी बोर्ड लावले आहेत. टाकलेल्या कचऱ्यामधील कागदपत्र शोधून मोबाईल नंबर मिळवून कचरा टाकणाऱ्याला ग्रामस्थांनी शोधून काढून त्याला समज दिल्याचे प्रकार उघड झाले आहेत.

बेशिस्त ग्रामस्थांनी कचरा केल्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरासमोर कचरा आहे. असे समजून त्याची विल्हेवाट लावावी. यापुढे कुठेही कचरा टाकणाऱ्यांना आम्ही चांगलीच अद्दल घडवू सुमित पिलणकर, ग्रामस्थ, काजरघाटी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 08/Jan/2025