कोतापूरमध्ये दारू जप्त; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी : विनापरवाना राज्य व गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बाळणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत २ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयिताविरुद्ध राजापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जनक आत्माराम जाधव (४४, रा. कोतापूर, बौद्धवाडी, ता. राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) दुपारी साडेचारच्या सुमारास कोतापूर बौद्धवाडी येथील बुद्धविहाराच्या मागील बाजूस निदर्शनास आली.

कोतापूर येथे विनापरवाना राज्य व गोवा बनावटी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी २ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी महिला पोलिस हवालदार हर्षदा चव्हाण यांनी राजापूर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 08-01-2025