रत्नागिरी : तालुक्यातील श्रमिक किसान सेवा समिती रत्नागिरी संचालित, लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत स्वच्छ सागर अभियानांतर्गत गावखडी समुद्र किनाऱ्याची साफसफाई करण्यात आली. या अभियानामध्ये गावखडी ग्रामपंचायत सरपंच गौतम पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी, ग्रामस्थ, बचत गटातील महिला सदस्या सहभागी झाले होते. या अभियानांतर्गत पूर्णगड किल्ला येथे जाऊन ही स्वयंसेवकांनी साफसफाई केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 30/Sep/2024














