लांजा : लांजा तालुका सह्याद्री बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या अध्यक्षपदी मिलिंद गांधी तर सचिव पदी सारीम वाघू यांची निवड करण्यात आली. भांबेड येथे झालेल्या एका बैठकीमध्ये सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा व चिखल नांगरणी स्पर्धा होत आहेत. कोणातील गावाची मंडळे, राजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वेळा स्पर्धा होत असतात. मात्र बैलगाडा चालक-मालक यांची संघटना कुठेच आढळून येत नाही, हीच बाब लक्षात घेऊन समाजिक कार्यकर्ते च मनसेचे लांजा तालुका संपर्क प्रमुख किरण रेवाळे यांनी संकल्पना मांडून सह्याद्री बैलगाडा चालक-मालक संघटनेची कार्यकारिणी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यानुसार लांजा तालुक्यातील बैलगाडा चालक-मालक यांनी ही बाब लक्षात घेऊन एकत्रित येत सह्याद्री बैलगाडा चालक-मालक संघटनेची स्थापना केली.
संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष अल्लाउद्दीन नेवरेकर, खजिनदार अवधूत रामाने, सहसचिव किरण रेवाळे, कार्यवाह संजय गवळी, अनंत झोरे, जगन्नाथ मटकर, संघटक गणेश कोलापटे, राजन लिंगायत, संदेश पावसकर, सल्लागार द्वारकानाथ माने, परशुराम रसाळ यांची निवड करण्यात आली. सह्याद्री बैलगाडा चालक-मालक संघटनेची बैठक तालुक्यातील भांबेड येथील भालचंद्र लाड यांच्या निवासस्थानी झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 08/Jan/2025














