रत्नागिरी : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता २०२४-२५ या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन भरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. दहावी नंतरच्या अभ्यासक्रमांना व १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी https://hmas.mahait.org पोर्टलवर ऑनलाईन राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 08-01-2025













