नाणीज येथे आज आणि उद्या ५२ वे रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन

रत्नागिरी : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ नाणीज संचलित माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज नाणीज यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन ९ व १० जानेवारी रोजी होत आहे.

माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज नाणीज येथे गुरुवार ९ जानेवारी रोजी उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली – आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत यांनी दिली.

गुरुवारी सकाळी ९ वाजता विज्ञान दिंडी, सकाळी ११ ते १ या वेळेत उद्घाटन समारंभ, दुपारी १ ते ५ प्रतिकृतींचे परिक्षण आणि प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. त्याचदरम्यान प्रश्नमंजुषा आणि विज्ञान प्रतिकृती कार्यशाळा होणार आहे. १० जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ विज्ञान शिक्षकांसाठी उद्बोधन वर्ग आणि सायंकाळी ४ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 09/Jan/2025