खेड : तालुक्यातील जामगे येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलीत छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विविध शालेय खेळांच्या स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. त्यामध्ये जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत २ सुवर्णपदके, ६ रजत पदके व ३ कास्य पदके पटकावली आहेत. तसेच जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये २ सुवर्णपदके आणि १ कांस्यपदक मिळविले असून जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत २० सुवर्णपदके १० रजत पदके व ७ कांस्य पदके पटकावली आहेत. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय शालेय नेट बॉल स्पर्धेत प्रशालेच्या १४,१७, व १९ वर्षे वयोगटातील तिन्ही संघानी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी डेरवण क्रीडा संकुल तालुका चिपळूण येथे झालेल्या बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत १४ आणि १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 30/Sep/2024














