संगमेश्वर : कडवई कुंभारवाडी येथे जाळ्यात अडकलेल्या सर्पाला जीवदान

सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील कडवई कुंभारवाडी येथील सर्पमित्र श्रीरंग कुंभार यांनी शेताच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या जाळयामध्ये अडकलेल्या धामण सापाला जीवदान दिले. ही धामण रात्री भक्ष्याच्या शोधात असताना जाळ्यात अडकलेली होती. सुटकेसाठी प्रयत्न करूनही तिला बाहेर पडता येत नव्हते. सकाळी साडेसातच्या सुमारास शेतात फेरफटका मारावयास गेलेल्या कुंभार यांना जाळ्यामध्ये सुटकेसाठी तडफडत असलेली धामण दिसली, यावेळी त्यांनी तत्काळ आपला मुलगा सर्वेश याला हाक मारून कैची मागवून घेतली. अवघ्या वीस मिनिटांतच अडकून राहिलेल्या सापाला कोणतीही इजा न होता जाळे कापून धामण जातीच्या सापाला मुक्त केले.

त्यानंतर त्याला जंगल अधिवासात सोडून दिले. कुंभार हे माखजन न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ग्रंथपाल आहेत. त्यांनी या अगोदरही पा अनेक सापांना जीवदान दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 30/Sep/2024