साडवली : देवरूख कॉलेज रोड ते गणेश नारकर यांच्या परिसरात अनेक वर्षे पाण्याचा प्रश्न असून त्याकडे देवरूख नगरपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. वारंवार प्रत्यक्ष भेटूनही कारवाई होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
पाण्याच्या प्रश्नाबाबत रहिवाशांनी नगरपंचायतीला निवेदन दिले आहे. योग्य कारवाई न झाल्यास या वर्षाची पाणीपट्टी न भरण्याचा रहिवाशांनी निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॉलेज रोड ते श्री गणेश नारकर या परिसरातील रहिवाशांना गेली एक ते दीड वर्षे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काहीवेळा अनेकांना पाणीच मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्यापासून रहिवाशांना वंचित राहावे लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 09-01-2025












