लांजा : लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित जनसमुदाय पाहता उबाठा पूर्ण खाली झालेली आहे. आता जे कुठे जायचे तिकडे जाऊ द्या. आमदार किरण सामंत यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या विकासकामांची ही पोचपावती आहे. लांजा-राजापूर-साखरपाचे आमदार किरण सामंत यांच्या पुढच्या वाढदिवसापर्यंत मतदारसंघातील एकही काम शिल्लक ठेवणार नाही, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी दिले.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचा लांजा शहरातील आग्रे गणेश मंगल कार्यालय येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आपले मोठे बंधू आमदार किरण सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत लांजा येथे आले होते. याप्रसंगी शुभेच्छा देताना ते बोलत होते.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत व कार्यकर्ते, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आमदार किरण सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी लांजा तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व राजकीय तसेच ठेकेदार, विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मित्र परिवार अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आग्रे हॉल येथे आमदार किरण सामंत व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरुप, नगराध्यक्ष मनोहर बाईत, लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगरसेवक नंदराज कुरूप, प्रसाद भाईशेट्ये, दुर्वा भाईशेट्ये, शिवसेना शहर प्रमुख सचिन डोंगरकर, सुजित आंबेकर, दिनेश पवार, प्रसाद माने, चेतन खंदारे, सुरज कुडतडकर, नगरसेविका मधुरा लांजेकर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक, महंमद रखांगी, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊ वांजरे, विजय कुरुप, विकास शेट्ये आदींसह जनसमुदाय उपस्थित होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 09/Jan/2025














