संगमेश्वर : तालुक्यातील आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच सोनवी पुलाचे कामही सुरू आहे. शास्त्रीपुलाचे काम पूर्ण झाले असून, सोनवी पुलाचे काम रखडले आहे. रखडलेल्या कामामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा फटका संगमेश्वरवासीयांना सहन करावा लागत आहे.
महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहतूक कोंडीमुळे सोनवी पुलादरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. मुंबई-पुणे तसेच गोव्याकडे आणाऱ्या वाहनांना मोठा फटका बसला आहे.
एका तासाच्या प्रवासासाठी दोन तास एवढा वेळ लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरात लवकर सोनवी पुलाचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी चालकांसह स्थानिकांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 30/Sep/2024














