Sangmeshwar : ‘आरवली-वाकेड’ महामार्गाचे काम २०२४ मध्येही रखडणार?

रत्नागिरी : मुंबई-गोवा चौपदरीकरणातील आरवली ते तळेकांटे या सहाव्या टप्प्यातील कामाच्या प्रगतीचा आलेख अजूनही मंदावलेलाच आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हातखंबा जंक्शनचा आराखडाही मंजुरी प्रक्रियेतच रखडल्यामुळे आरवली ते वाकेड या सहाव्या टप्प्यांतील काम २०२४ मध्ये रखडण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी तालुक्यात सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासोबतच मिऱ्या-नागपूर महामार्गाचे कामही सुरू आहे. हे दोन्ही महामार्ग तालुक्यातील हातखंवा येथे एकत्र येणार आहेत. त्यामुळे येथे महामार्गाचे जंक्शन उभारण्यात येणार आहे. मात्र, याच गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुलाचेही काम होणार आहे. मात्र, या दोन्हा कामांच्या आराखड्याला मंजुरीच मिळालेली नाही. सध्या हे काम संथ गतीने सुरू आहे. या ठेकेदारालाही डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण न केल्यास कामाचा ठेका रद करण्यात येणार असल्याची अतिम नोटीस देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या ५ मे २०२३ च्या अधिसूचनेनुस्वर मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाला सुरुवात झाली. या चौपदरीकरणात परशुराम ते आरती, आरवली ते तळेकांटे, तळेकांटे ते वार्केड, वाटूळ ते तळगाव, तळगाव में कळमठ आणि कळमठ ते अशा सहा टप्प्यांतील कामाची जबाबदारी महामार्ग विभाग रत्नागिरीकडे सोपविण्यात आली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 30/Sep/2024