पुणे : माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी केलेल्या एका वक्तवाने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रग्रंथात कुठेही फातिमा शेख यांचा उल्लेख नाही असं दिलीप मंडल यांनी म्हटलं आहे.
फातिमा शेख हे कल्पोकल्पित पात्र आहे, असं वादग्रस्त वक्तव्य दिलीप मंडल यांनी केलं आहे, तर दुसरीकडे फातिमा शेख यांचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये आढळल्याचा दावा देखील केला जातो. हे पात्र आहे इतिहासात असल्याचं बोललं जातं त्याचबरोबर फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांन मदत केल्याचं सांगितलं जातं, मात्र दिलीप मंडल यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
दिलीप मंडल हे अनेक वर्षे माध्यमांमध्ये होते. ते प्राध्यापक आहेत. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केलं आहे. पुस्तके लिहली आहेत. विशेषत: त्यांनी संघावर, भाजपवरती आणि हिंदुत्वावरती अनेकदा कठोर टीका केलेली आहे. फातिमा शेख यांच्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले जीवनातील उल्लेखाविषयी दिलीप मंडल यांनी मोठा दावा केला आहे. दिलीप मंडल यांच्या म्हणण्यानुसार, फातिमा शेख त्यांची ही निर्मिती आहे, तर त्याविषयीचे संदर्भ उपलब्ध नाहीत. दिलीप मंडल यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारपदी ऑगस्ट 2024 मध्ये नेमणूक झाली होती. दिलीप मंडल यांनी त्यांच्या लिखाणाच्या संदर्भावरून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 09-01-2025













