ठाकरे शिवसेनेत उरलेत ते केवळ दगड : खासदार नारायण राणे

रत्नागिरी : ठाकरे शिवसेनेत आज कोणीही शिल्लक राहिलेले नाहीत. आता उरलेत ते केवळ दगड. मागे जो पूर आला त्यात ते वाहून गेलेत, अशी खिल्ली खासदार राणे यांनी उडवत आज भाजपला चांगले दिवस आले असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरीत भाजपचे गुरुवारी संघटन पर्व आढावा बैठकीसाठी खासदार नारायण राणे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राजकीय प्रवाह भाजपच्या दिशेने वाढत चालला आहे, त्यामुळे येणार्‍यांचे स्वागत केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

कोकणात विशेषकरून रत्नागिरी येथे मतदारसंघात रोजगार, पायाभूत सुविधा आणि येथील लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. येथे उद्योग येण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री व आपण चाचपणी केली आहे. कोणत्या भागात कोणते उद्योग आणायचे, ते उद्योग कोणत्या भागात चालतील, यावर विचार करण्यात आला आहे. त्यासाठी येथे दोन-तीन भागात विभागणी करण्यात येणार आहे. उद्योगांसाठी साधनसामग्री जेथे उपलब्ध होईल, तेथे उद्योग नेणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

या रेल्वेकडे कर्मचार्‍यांचे पगाराचे पैसे द्यायला, प्रवाशांसाठी सुख-सुविधा देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ही रेल्वे मध्य रेल्वेकडे समायोजन केल्यास कोकण रेल्वेचा जलदगतीने विकास होईल, असे राणे यांनी सांगितले आहे.

राणे यांनी ठाकरे शिवसेनेच्या ढासळत्या राजकीय वाटालीवर खिल्ली उडवली. रत्नागिरीतील अनेकजण ठाकरे सेनेतून भाजपाच्या वाटेवर आहेत, अनेकजण प्रवेशकर्ते देखील झालेले आहेत. राजकीय प्रवाह भाजपाच्या दिशेने वाढत चालला आहे, त्यामुळे येणार्‍यांचे स्वागत केले पाहिजे, भाजपा केंद्र आणि राज्यात आहे. लोकांना त्यामुळे विकास दिसतो आहे. या सरकारने जनहिताच्या अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे भाजपा लोकांना सुरक्षित पक्ष वाटत असल्यो राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अ‍ॅड. बाबा परुळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तिन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यानी लक्ष द्यावे..
डबघाईस आलेले कोकण रेल्वे महामंडळ मध्य रेल्वेकडे समायोजन करण्यात आल्यास योजनांनी जलदगतीने कोकण रेल्वेचा विस्तार व विकास होईल. त्या योजनांच्या अंमलबजावणीने प्रवाशांनी सुख-सुविधा मिळतील. कोकण रेल्वे ज्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यातून जाते, त्या तिन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यानी त्या समायोजनासाठी परवानगी देणे गरजेचे असल्याचे राणे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 10-01-2025