नाणीज हायस्कूलमध्ये कोकणातील पहिले इस्रोचे प्रशिक्षण केंद्र

पाली : नाणीज शिक्षण उद्योजक संस्था ही कायमच नवनवीन संधी शोधत असते. त्यामधूनच कोकणातील पहिले इस्रोचे प्रशिक्षण केंद्र काही महिन्यांपूर्वीच नाणीज हायस्कूलमध्ये सुरू झाले आहे. त्याचा सुमारे १४०० विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. लवकरच आम्ही पाच किलोमीटरपर्यंतच्या उढाण क्षमतेचे रॉकेट लॉन्चिंगसाठी परवानगी घेऊन तो प्रकल्पही सुरू करणार आहोत, असे प्रतिपादन नाणीज शिक्षगोतेजक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी केले.

नाणीज येथे सुरू झालेल्या माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि माध्यमिक विद्यामंदिर नाणीज यांच्या संयुक्त विद्यमाने ५२वे रत्नागिरी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उटनप्रसंगी ते बोलत होते. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान ही या प्रदर्शनाची थीम आहे. भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञाननगरीत आयोजित प्रदर्शनाला नाणीज शिक्षणोतेजक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम, शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार, तालुका गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक गोपाळ चौधरी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक नरेंद्र गावंड, शिक्षणविस्तार अधिकारी संदेश कडव, जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष सुदेश कदम उपस्थित होते.

हे प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार आहे. याप्रसंगी कदम म्हणाले, नाणीज प्रशालेत स्वतंत्र सायन्स पार्क व ऑडिटोरियमही सुरू केले आहे.

लवकर सॅटेलाईट प्रयोगशाळाही सुरू करणार असून, त्यासाठी इस्रोकडून दर दोन महिन्यांनी एक तज्ज्ञ शास्त्रज्ञ येऊन मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी शिक्षणाधिकारी सावंत म्हणाल्या, रत्नागिरीने देशाला अनेक महान रत्ने दिली आहेत. त्यामुळे इतिहासात रत्नागिरीची ओळख ही रत्नांची खाण अशी केली जाते. ती ओळख अशा विज्ञान प्रदर्शनातून कायम ठेवायची आहे. जगातील अनेक शास्त्रज्ञ हे स्वःबुद्धीवर व कर्तृत्वाने वेगवेगळी संशोधने करून क्षमता सिद्ध करतात. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून आपल्या संशोधक बुद्धीला चालना द्यावी आणि नवा इतिहास घडवावा.

नाणीज हायस्कूलचे कौतुक
कोकण बोर्ड हे राज्यात शिक्षण क्षेत्रात अव्वल असून, ती परंपरा आपल्याला सर्वच शैक्षणिक क्षेत्रात कायम ठेवायची आहे. त्यासाठी विज्ञान शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून विज्ञान वैज्ञानिक जनजागृती केली पाहिजे, त्याचसोबत नाणीज हायस्कूलने अत्यंत कमी वेळेत नेटके नियोजन केले आहे, असे शिक्षणाधिकारी सावंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 10/Jan/2025