रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम शिरगांव, रत्नागिरी च्या तृतीय वर्षाच्या ७ विद्यार्थ्यांसाठी फिश प्रोसेसिंग अँड रेफ्रिजरेशन मशिनरी या विषया अंतर्गत विद्यापीठाचे श्री. कुलगुरू डॉ. संजय भावे सर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे सर, आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. ठोकळ सर यांची परवानगी आणि मार्गदर्शनाखाली निशिंडो फूड्स प्रा. लि. वेरावळ येथे कार्यानुभव प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यानुभव प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कु. जान्हवी कदम, कु. वेदांती शिर्के, कु. मौसमी कोयांडे, कु. कृतज्ञता पाटील, कु. अर्चीता पाटील, कु. श्रावणी बाणे, आणि ओमकार कांबळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून सुरीमी फिश प्रोसेसींग तंत्रज्ञान, रेफ्रीजरेशन तंत्रज्ञान, सूष्म जीव शास्त्र तसेच विविध मुल्यवर्धी मत्स्य पदार्थ निर्मिती त्यांचे व्यवस्थापन व मार्केटिंग विषयक सखोल ज्ञान आत्मसात करत आहेत. सहाय्यक प्राध्यापक श्री. तोसिफ काझी या कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्वय म्हणून काम पाहत असून निशींडो फुडस चे जनरल मॅनेजर श्री. विजय वारा हे कार्यानुभव कार्यक्रम वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांकडून झालेला अभ्यासाचा आढावा घेत आहेत.
नुकतेच डॉ. आशिष मोहिते, प्राचार्य / सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव यांनी निशिंडो फूड्स प्रा. लि. वेरावळ येथे प्रत्यक्ष भेट देवून सहभागी विद्यार्थी आणि निशिंडो फूड्स चे कर्मचारी यांच्याशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांसोबत कार्यानुभव कार्यक्रमाबद्दल चर्चा केली आणि त्यांचे कौतुक केले.
श्री. विजय वढेर यांच्याकडून डॉ. आशिष मोहिते यांनी निशिंडो फुड्स च्या विविध विभागांची ओळख करून घेतली. सर्वप्रथम फिश कटिंग शेड मधील कामकाज व व्यवस्थापन समजून घेतले. त्यानंतर रेफ्रिजरेशन सेक्शन मधील विविध मशिनरी यांची माहिती घेतली व वॉटर सॉफ्टींग युनिट चे काम पाहिले. मायक्रोबायोलॉजी लॅब आणि क्वालिटी कंट्रोल लॅब मधील कामकाज जाणून घेतले तसेच सर्वात शेवटी सुरिमी प्रक्रिया लाईन च्या विविध विभागांचा आढावा घेतला. डॉ. आशिष मोहिते यांनी नंतर वेरावळ मासेमारी बंदराला भेट देवून बंदरावर चालणाऱ्या मासेमारी संबंधीत विविध कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.
हा कार्यानुभव कार्यक्रम निशिंडो फूड्स प्रा. लि. वेरावळ मध्ये आयोजित करण्यास परवानगी तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी श्री. दीपक चौधरी, व्यवस्थापकीय संचालक, निशिंडो फूड्स प्रा. लि. वेरावळ यांचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे या कार्यानुभव प्रशिक्षणांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करत असलेल्या श्री. दुर्गेश खोरावा, व्यवस्थापकीय संचालक, श्री. विजय वारा, जनरल मॅनेजर आणि श्री. विजय वढेर, प्रोडक्शन मॅनेजर यांचे सुद्धा मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम तर्फे आभार व्यक्त करून हा कार्यानुभव कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्य विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरेल अशी आशा व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 10-01-2025














