चिपळुणात श्री सदस्यांकडून साडेसहा टन कचरा संकलित

चिपळूण : चिपळूण येथील श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवून दोन तासात तब्बल साडेसहा टन कचरा गोळा केला. यामुळे हा परिसर पूर्णपणे स्वच्छ झाल्याचे दिसून आले.

स्वच्छता ही सेवा २०२४ यामध्ये देशात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या पंधरवड्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे चिपळूण पालिका कार्यालय ते बहादूरशेख नाका या रस्त्याच्या दुतर्फा सकाळी ७ ते साडेनऊ यावेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात एकूण १०६ सदस्यांनी सहभाग घेऊन साधारण साडेसहा टन कचरा गोळा केला. श्री सदस्यांनी मास्क, फावडे, घमेली, पिशव्या, झाडू आदी साहित्यासह याठिकाणी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी पालिकेचे प्रशाकीय अधिकारी मंगेश पेढामकर, महेश जाधव, सुजित जाधव, प्रसाद साडविलकर, वलिद वांगडे, विजय गमरे व त्यांचे सहकरी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 30/Sep/2024