रत्नागिरी : जिल्हा पोलिस विभागाच्या क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पोलिस मुख्यालयाने पटकावले. तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रल्हाद खोकले आणि अमृता वडाम यांची निवड करण्यात आली.
विभागीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी विभाग, चिपळूण विभाग, लांजा विभाग, खेड विभाग आणि मुख्यालयातील स्पर्धकांचा समावेश होता. यामध्ये १०० मिटर धावणे गटात अतुल पाटील आणि अमृता वेडाम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. २०० मि. गटात अजय लोहार व कोमल सावते, ४०० मि. गटात प्रल्हाद खोकले, ८०० मि. गटात प्रतीक राजपूरे, १५०० मि. गटात प्रतीक राजपुरे व सायली मेंगे, ५ हजार मि. गटात प्रतीक राजपुरे व सायली मेंगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच भालाफेक स्पर्धेत योगेश जाधव व अमृता वडाम, थालीफेकमध्ये अनिकेत शिंदे व अर्चना मगदूम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गोळाफेक स्पर्धेत अनिकेत शिंदे व दिव्या शितोळे यांनी तर लांबउडी स्पर्धेत प्रल्हाद खोकले व वर्षा राठोड यांनी प्रथम क्रमांक मिळवला. १०० बाय ४ रिले स्पर्धेत अतुल पाटील, अजित पायभल, सचिन पाटील यांनी तर सोनाली कोलापटे, पल्लवी हिंगोले व प्रणाली सुवरे व कोमल सावते यांनी प्रथम क्रमांक पटकावला. फुटबॉल स्पर्धेत पोलिस मुख्यालय रत्नागिरीने, हॉकी स्पर्धेत रत्नागिरी विभागाने, कबड्डी पुरुष व महिला तसेच व्हॉलिबॉल स्पर्धेत पोलिस मुख्यालय, रत्नागिरीने विजेतेपद पटकावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 30-09-2024














