माखजन हायस्कुल चा १०७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल चा १०७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावर्डे भुवडवाडी शाळेचे मुख्याध्यापक अमरदीप कदम उपस्थित होते.तर व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव दीपक पोंक्षे,सह सचिव दीपक शिगवण,संजय सहस्त्रबुद्धे, मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी ट्रस्ट च्या माध्यमातून असलेली बक्षिसे वितरित करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमर दीप कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.१०७ वर्षे जुनी असलेली शाळा चालू करताना ,पारतंत्र्यात किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या असतील याविषयी बोलताना,त्या त्यागमूर्ती ना आदरांजली वाहिली.ही शाळा आहे,म्हणून आपण सुलभ शिक्षण घेऊ शकतो याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला असली पाहिजे असे नमूद केले.यावेपी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्था उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमावेळी बक्षीस वितरणाचे वाचन प्रा गौस मुल्ला यांनी केले.कार्यक्रमावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी मानले.व सूत्रसंचालन महादेव परब यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 10-01-2025