लांजातील अनोळखी परप्रांतीय लोकांनी मुक्काम हलवला

लांजा : लांजा शहरासह ग्रामीण भागात परप्रांतीय अनोळखी २५ ते ३० लोकांचा वावर सुरू होता. याबाबत वृत्त प्रसारित करताच सुज्ञ नागरिकांनी दखल घेऊन समूहाने राहणाऱ्या त्या परप्रांतीय लोकांना समज देऊन शहरातून बाहेर जाण्यास सांगितले. शहरातील लोकवस्तीमध्ये झोपड्या बांधून वस्ती केलेला या लोकांनी अखेर लांजा शहरातून आपला मुक्काम हलवला.

गेली दहा ते बारा दिवसांपासून तालुक्याच्या लांजा शहरात अनोळखी २५ ते ३० जणांचा समूह झोपड्या तयार करून वास्तव्य करत होता. लांजा शहरासह ग्रामीण भागात स्त्री, पुरुष यांचा वावर दिसून आला होता. या अनोळखी व्यक्तींवावत संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली होती. वाडी-वस्तीमध्ये फिरताना हे अनोळखी चेहरे नजरेस पडत असल्याने ग्रामीण भागातील महिलावर्गामध्ये भीती वातावरण पसरले होते.

या व्यक्ती लांजा शहरामधेही राहत असल्याचे निदर्शनास आले. त्या मधील काहीजण खेळ करण्यासाठी आलो, तर काहीजण फुल बिया विकणे, नागरिकांच्या घरी जाऊन औषधे देतो, असे सांगून फिरत होते. २५ ते ३० माणसे वास्तव्यला होती. याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच लांजा शहरातील सुज्ञ नागरिकांनी त्या माणसाच्या वास्तव ठिकाणी जाऊन माहिती घेतली व त्यांना शहरातून अन्य ठिकाणी जावे, अशी समज दिली. लांजा पोलिसांनी त्या अनोळखी माणसांची माहिती घेतली. अखेर गेली दहा ते बारा दिवस ठाण मांडून वस्तव्य करत असलेल्या त्या अनोळखी परप्रांतीय माणसांचा समूहाने लांजा शहरातून आपला मुक्काम हलवला आहे.

परप्रांतीय अनोळखी माणसे वास्तव्याला किंवा जास्त काळ दिसून आले तर नागरिकांनी सतर्क रहावे. अशा व्यक्तींची माहिती पोलिसांना द्यावी. – नीलकंठ बगळे पोलिस निरीक्षक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 30/Sep/2024