वुमेन्स कार्निव्हल मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रोज ४० हजारांची बक्षिसे

◼️ १३०० रुपयांच्या खरेदीवर मिळाली २० हजाराची रिअल डायमंड रिंग

रत्नागिरी : रत्नागिरी खबरदार आयोजित वुमेन्स कार्निव्हल २०२५ ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दररोज या कार्निव्हल मध्ये ग्राहकांना ४० हजारांची आकर्षक बक्षिसे देण्यात येतात.

काल दिवसभरात खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना काल रात्री ८ वाजता बक्षिसे देण्यात आली. यामध्ये केवळ १३०० रुपयांच्या खरेदीवर रेश्मा कांबळे यांना २० रुपये किमतीची रिअल डायमंड रिंग मिळाली आहे तर इतर ग्राहकांना २० हजाराची आकर्षक बक्षिसे मिळाली आहेत. यातील काही बक्षिसे एस एस कम्युनिकेशन देखील प्रायोजित केली आहेत.

किस्ना डायमंड ज्वेलरी, अमेय ज्वेलर्स आणि रत्नगिरी खबरदार कडून हि रिंग प्रायोजित करण्यात आली आहे. अमेय ज्वेलर्स चे अमेय वीरकर, रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु, उद्योजक सौरभ मलुष्टे, एस एस कम्युनिकेशन चे अमोल डोंगरे यांच्या उपस्थितीत या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. वुमेन्स कार्निव्हल मध्ये खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला बक्षिसे जिंकण्याची संधी असून कार्निव्हल च्या ४ दिवसात १ लाख ६० हजारांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 10-01-2025