काँग्रेस चिपळूण तालुका उपाध्यक्षपदी संजय जाधव यांची निवड

चिपळूण : लोकसभा निवडणुकीत कोकणात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर काँग्रेसने संघटना मजबुतीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये तालुक्यातील दळवटणे येथील मूळचे रहिवासी असलेले संजय भालचंद्र जाधव यांची रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

जिल्ह्यातील तालुकनिहाय, पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटनिहाय पदांची निवड केली जात आहे. त्याअंतर्गत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या संमत्तीने तालुका उपाध्यक्षपदी संजय जाधव यांची निवड केली आहे. रत्नागिरी जिल्हा काँग्रेस भवनमध्ये झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य, कोकण प्रभारी बी. एम. संदीप, लोकसभा प्रभारी देशराज मीना, तामिळनाडू महिला अध्यक्षा व रायगड जिल्हा प्रभारी हसीना सय्यद, माजी आमदार हुसनबानू संजय जाधव खलफे, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, महाराष्ट्र प्रदेश सचिव परशुराम खेत्री, माजी जि. प. शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर, तालुकाध्यक्ष लियाकत शाह, महिला अध्यक्ष विभावरी जाधव, महिला प्रदेश काँग्रेसच्या रुपाली सावंत, युवकच्या राज्य प्रदेश उपाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, युवकचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 30/Sep/2024