गुहागर : श्रृंगारपूर ग्रामपंचायतीने बसवलेल्या कातुर्डे येथील सौरदीप पोलाला चालकाने निष्काळजीपणे केलेल्या ड्रायव्हिंगमुळे ठोकर दिली आहे. यामुळे सौरदीपाचे मोठे नुकसान झाले आहे.
संगमेश्वर श्रृंगारपुर कातूर्डी संध्याकाळी ४.४५ वा. च्या एस. टी. चालक सुभाष थित्ते यांनी कातूर्डी येथे बस स्टॉप वरील एस. टी. चालक वाहक यांच्या सुविधेसाठी ग्रामपंचायत श्रृंगारपुर कार्यालयाकडून लावण्यात आलेल्या सौरदीप ला ठोकली व यामुळे पोल वाकला असून सौरदिवा तुटून खाली रस्त्यावर पडला आहे. तसेच यावेळी चालकाचे उद्धट वागणे पाहून सरपंच श्री. विनोद पवार यांनी चालक संतोष गंगाराम थित्ते यांच्या विरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाणे येथे तक्रार करून एस. टी. प्रशासनाकडे या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 10/Jan/2025