रत्नागिरी : १० वर्षात ग्रामपंचायतीनी दिलेल्या जन्म दाखल्यांची चौकशी करण्याची भाजपाची मागणी

रत्नागिरी : काही दिवसापूर्वी शिरगाव ग्रामपंचायती कडून बांगलादेशी नागरिकाला खोटा जन्म दाखला देण्यात आला होता. अश्या गंभीर गुन्ह्याची सखोल चौकशी करावी.मागील १० वर्षात सर्व ग्रामपंचायतींची दिलेल्या जन्म दाखल्यांची चौकशी करावी व दोषी आढळल्यांवर गुन्हे दाखल करावे यासाठी जिल्हाध्यक्ष यांचे आदेशाने भाजपा कडून जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेण्यात आली व निवेदन देण्यात आले.

दि.१२ रोजी शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन आहे,त्याठिकाणी मा.मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील यासंदर्भातील पत्र देण्यात येणार आहे.दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी भारतीय जनता पक्ष रत्नागिरी च्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.वर्षा ढेकणे,जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण,सुप्रिया रसाळ,युवामोर्चा प्रदेश सचिव विक्रांत जैन,जिल्हा उपाध्यक्ष बाबू सुर्वे, मंडल खजिनदार शैलेश बेर्डे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:57 PM 10/Jan/2025