राजापूर : तालुक्यातील डोंगर येथे एका ३५ वर्षीय मूकबधीर महिलेवर अत्याचार झाल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी त्या पीडित महिलेच्या आईच्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे. डोंगर येथील ही पीडित महिला मूकबधिर आहे. ती आपल्या आई- वडिलांसोबत राहते.
गुरूवारी शेतावर गेलेल्या वडिलांना दुपारी डबा देण्यासाठी आई घराबाहेर पडल्यानंतर घरात कुणीही नाही पीडिता एकटीच आहे, याचा फायदा घेत त्या संशयित आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती पुढे आली आहे. दाखल फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली. या घटनेची माहीती मिळताच पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 11/Jan/2025














