खेड : तालुक्यातील साखरोली- मोरेवाडी येथील श्रीमती धोंडी बाळकृष्ण गोलांबडे (वय ८५) या बेपत्ता वृद्धेचा सांगाडा जंगलमय भागात आढळून आला. ही घटना २६ नोव्हेंबर २०२४ ते ९ जानेवारी या कालावधीतील आहे.
येथील पोलिसांनी ९ जानेवारीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. धोंडी गोलांबडे या बेपत्ता असल्याची तक्रार खेड पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. याप्रकरणी शोध घेत असताना ९ जानेवारीला साखरोली- मोरेवाडी जंगलमय भागात कुत्रे भुंकत असल्याचे दिसले. त्यावेळी जवळ जाऊन पाहिले असता मानवी सांगाडा दिसला. मृताच्या अंगावरील लाल रंगाची साडी व गळ्यातील दोरा त्या ठिकाणी मिळून आला. त्यावरून हा सांगाडा धोंडी गोलांबडे यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 11-01-2025














