जाकादेवी येथील वृध्द महिलेचा मृतदेह आढळला गुहागरात

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील कुडली मोड खाडीकिनारी शुक्रवार 27 रोजी दुपारी 73 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सातारा येथील असलेल्या रंजना बालोसा थोरात या रत्नागिरी तालुक्यातील जयगड जाकादेवी येथे आपल्या शिक्षक असलेल्या मुलाकडे राहत होत्या. 1 सप्टेंबर रोजी बाजारात जाऊन येते अशा सांगून घराबाहेर पडल्या होत्या. घरी न परतल्याने मुलाने जयगड पोलीस स्थानकात आई बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास गुहागर तालुक्यातील कुडली मोड खाडीकिनारी रंजना थोरात यांचा मृतदेह आढळून आले. सादर प्रकरणाचा अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:56 30-09-2024