दापोलीतील भूमी अभिलेख कार्यालय सापडणार चौकशीच्या फेऱ्यात ?

दापोली : सामान्य नागरिकांची कामे हेतूतः अडवली जातात, वेळेत होत नाहीत, अशा असंख्य तक्रारी या आधी दापोली भूमी अभिलेख कार्यालयाबाबत सुरू होत्या. त्यात आता दापोलीतील नागरिकांच्या एका लेखी पत्राची भर पडली असून या कार्यालयातील अधिकारी थेट पैशांची मागणी करतात, अशा आशयाचे पत्र दापोलीतील काही नागरिकांनी महसूल तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना लिहले आहे. त्यामुळे दापोली भूमी अभिलेख हे चौकशीच्या फेऱ्यात येणार का, अशी चर्चा दापोलीत सुरू आहे.

मोजणीची तारीख लावणे, नकाशा काढणे, मोजणी करणे इत्यादी कामांसाठी चलन भरणे, कजाबची प्रकरणे प्रलंबित ठेवणे इत्यादी कामांसाठी टाळाटाळ केली जात आहे. असे अर्जात नमूद करण्यात आले असून या र्जात एका अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेखही करण्यात आला आहे.

पत्रकारांनी ही बाबत येथील वरिष्ठ अधिकारी यांचे निदर्शनास आणून दिली आहे. तर काही कर्मचारी यांचे वर्तन हे सामान्य नागरिकांशी सौजन्यपूर्ण नसते. हे ही वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

या कार्यालयात अनेकदा इथली कागदपत्रे ही पक्षकार हाताळत असून या बाबत काही अजून कोणतीही तक्रार माझ्याकडे आली नाही. मात्र, येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. या बाबत लक्ष दिले जाईल. संभाजी मोतिबोने, उपअधीक्षक भूमी अभिलेख, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 11/Jan/2025