रत्नागिरीत २६ जानेवारीला ‘ई-वेस्ट कलेक्शन’ मेगा ड्राईव्ह

रत्नागिरी : अनबॉक्स युअर डिझायर आणि पुर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी मध्ये ई यंत्रण या उपक्रमाच्या अंतर्गत मेगा ड्राईव्ह होणार आहे. २६ जानेवारीला हा उपक्रम होणार असल्याची माहिती अनबॉक्स युअर डिझायरचे गौरांग आगाशे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आपणही समाजाचे काही देणे लागतो हे लक्षात घेऊन गेले अनेक महिन्यांपासून अनबॉक्स युअर डिझायर ‘प्लास्टिक कचरा संकलन’ आणि ‘जुने कपडे संकलन’ हे सामाजिक उपक्रम राबवत आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी अनबॉक्स युअर डिझायर कडून प्लास्टिक कचरा आणि जुने कपडे संकलन केले जाते व ते रिसायकलिंग ला दिले जाते. त्याचप्रमाणे अनबॉक्स युअर डिझायर तर्फे २६ जानेवारी व त्यानंतर देखील प्लास्टिक कचऱ्यासोबत ई-कचऱ्याचे देखील संकलन केले जाणार आहे, असे आगाशे सांगितले. यांनी

पुर्णम इकोव्हिजन फाउंडेशन ही संस्था गेली १० वर्ष पर्यावरण विषयात पुण्यात काम करत आहे. ‘कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि जास्तीत जास्त लोक सहभागातून शाश्वत विकास या मूलभूत गोष्टीवर पुर्णम इकोव्हिजन फाउंडेशन काम करते.

जुन्या कपड्यांपासून नवीन उत्पादने बनवणे आणि त्याची विक्री व्यवस्था. याला ‘परिपूर्णम’ असे नाव दिले आहे. ई यंत्रण या उपक्रमांतर्गत आपण ई- वेस्ट (सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आपल्याला आता नको आहेत) गोळा करून त्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी डोनेट करणे. ग्रीन कन्सल्टन्सी या उपक्रमांतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि कम्पोस्टिंग करून दिले जाते, असल्याचे आगाशे यांनी स्पष्ट केले.

ई यंत्रण या उपक्रमाच्या अंतर्गत पुर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन आणि अनबॉक्स युअर डिझायर यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी मध्ये २६ जानेवारी या दिवशी मेगा ड्राईव्ह होणार आहे. त्या दिवशी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत ई वेस्ट कलेक्शन केले जाईल. त्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे, जेणेकरून ई- वेस्ट योग्य ठिकाणी रिसायकलिंग साठी देता येईल व त्यापासून होणारे पर्यावरण प्रदूषण रोखता येईल, असे आगाशे यांनी सांगितले.

शहरातील अनबॉक्स युअर डिझायर साळवी स्टॉप, आगाशे फूडकोर्ट संभाजीनगर, सावंत रोडलाईन्स साळवी स्टॉप, धन्वंतरी मेडिकल मारुती मंदिर, अभिजीत करंबेळकर – शांतीनगर, सुवर्णसूर्य फाऊंडेशन शेरेनाका, मानस किराणा स्टोअर माळनाका, डी. के. जोशी सन्स जि.प. रत्नागिरी, आर्यन सोल्यूशन्स – रमेशनगर, अनिकेत कोनकर खेडशी, हॉटेल सी फॅन्स मांडवी, हर्ष दुडे कारवांचीवाडी, खादाडी कट्टा जोशी पाळंद, चिट चॅट क्लब थिबा पॉईंट या ठिकाणच्या केंद्रावर आपल्याकडील ई-कचरा नेऊन द्यावा, असे आवाहन पुर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन आणि अनबॉक्स युअर डिझायर तर्फे करण्यात येत आहे.

ई-कचऱ्यामध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे…
फ्लोरोसंट ट्यूबलाईटस्, इनकॅन्डेसन्ट बल्ब्स, सीएफएल्स

ई-कचऱ्यामध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे…
फ्रीज, वॉशिंग मशीन, प्रिंटर, कॉम्पुटर, फॅन्स, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, पेनड्राईव्ह, टीव्ही, डिजिटल कॅमेरा, एसी, व्हीडीओ कॅमेरा, सीडी / डीव्हीडी प्लेयर, मोबाईल फोन, होम थेटर्स, चार्जर्स, हेडफोन्स, आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स बर्किंग और नॉन वर्किंग आणि डिस्पोझेबल वस्तू.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:53 PM 11/Jan/2025