राजापूर : भालावली, नाटे परिसरात बीएसएनएलची सेवा कोलमडली

राजापूर : बीएसएनएलच्या कोलमडलेल्या सेवेमुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. तालुक्यातील भालावली, नाटे परिसरात बीएसएनएलची मोबाईल सेवा मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाली आहे.

बीएसएनएल मोबाईलला रेंज मिळत नसल्याने शेकडो ग्राहकांची निराशा झाली असून बीएसएनएलने आपली सेवा सुधारावी अन्यथा शेकडो ग्राहक अन्य खासगी सेवेकडे वळतील असा ईशारा देण्यात आला आहे.

बीएसएनएलला तालुक्यात सर्वत्र चांगले नेटवर्क असल्याने शेकडो ग्राहकांनी बीएसएनएल मोबाईलची कार्ड विकत घेतली. मात्र गेल्या काही वर्षांपासून बीएसएनएल सेवेला घरघर लागली आहे. राजापूर शहर आणि तालुका परिसरात बहुतांशी ठिकाणी रेंज मिळत नसल्याने ग्राहकांनी कंटाळून पर्यायी सेवा निवडली आहे.

मात्र आजही अनेक ग्राहक बीएसएनएलशी जोडले गेलेले असून तालुक्याच्या बहुतांश भागात नेटवर्क मिळत नसल्याच्या ग्राहकांतून तक्रारी आहेत. सध्याचे युग हे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट सेवेला विशेष महत्व आलेले आहे. असे असताना केंद्रीय दूरसंचार विभाग आपली सेवा सुधारण्यात अपयश ठरत असल्याने ग्राहकांतून तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 11-01-2025