गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या माध्यमातून गुहागर विधानसभा क्षेत्रातील युवक, युवर्तीसाठी शृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने संदर्भात जनजागृती मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मध केंद्र योजना, विश्वकर्मा आदी योजनांची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रत्नागिरी यांचे प्रतिनिधी अमित इंदुलकर (पर्यवेक्षक, उद्योग) यांच्याकडून देण्यात आली. यावेळी अमित इंदुलकर म्हणाले की, राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण २०१९ अंतर्गत अनेक नावीन्यपूर्ण योजना व कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने
हाती घेतले आहेत. सूक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर केली आहे. ग्रामीण भागासाठी के. व्ही.आय.बी. या एजन्सीकडे शासनाने कामकाज दिले आहे. खादी आयोगाने ठरविलेल्या नकारात्मक उद्योगाव्यतिरिक्त सर्व उद्योग या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. यामध्ये मांस प्रक्रिया, कॅनिंगशी संबंधित उद्योग, पान, हॉटेल/ढाबा ज्यामध्ये मद्य विक्री होते, शेती पिके, चहा, कॉफी, रबर शेती, रेशीम, हॉर्टिकल्चर फुलशेती पशुपालन, कुक्कुट पालन इ. उद्योगाचा समावेश आहे. यावेळी विनोद जानवळकर यांनी इंदूलकर यांचा सत्कार केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 11/Jan/2025














